आ. खताळ यांच्या सूचनेनंतर पालिकेने दाखवली माणुसकी! पिंजारी कुटुंबीयांना पालिकेकडून भरीव मदत : जहागीरदार

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
संगमनेर गटार दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रियाज जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांना भरीव स्वरूपाची आर्थिक मदत शासनाकडून मिळवून दिली जाईल, असे आ.अमोल खताळ यांनी सांत्वनपर भेटीत सांगितले होते. आ. खताळ यांच्या सूचनेनंतर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पिंजारी यांच्या घरी जाऊन माणुसकीच्या भावनेतून कुटुंबीयांचे सांत्वन करत भरीव स्वरूपाची आर्थिक मदत  कुटुंबियांकडे सुपूर्त केली असल्याचे भाजप नेते व माजी उपनगराध्यक्ष जावेद जाहगीरदार यांनी  सांगितले.
शहरातील कोल्हेवाडी रोडवर नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल जवळ भूमिगत गटारीचे चेंबरमधील मैला काढत असताना अतुल रतन पवार या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांचा चेंबरमध्ये गुदमरून  मृत्यू झाला होता. त्यावेळी पवार याला वाचविण्यासाठी गेलेल्या रियाज जावेद पिंजारी याचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. या घटनेतील मयत  अतुल पवार याच्या कुटुंबीयांना नगर परिषदेच्या  वतीने १० लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. परंतु रियाज पिंजारी हा सुद्धा मित्राला वाचविण्यास गेला होता म्हणून त्यालाही आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आ. अमोल खताळ यांच्याकडे पिंजारी यांच्या नातेवाईकांनी केली होती. त्यानुसार माणुसकीच्या भावनेतुन पिंजारी कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी चर्चा आ. अमोल खताळ आणि मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यात झाली.त्यानुसार  मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी पिंजारी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. व माणुसकीच्या भावनेतून पिंजारी कुटुंबीयांना भरीव स्वरूपातील आर्थिक मदत दिल्याबद्दल आ. अमोल खताळ यांनी  मुख्याधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
संगमनेर येथील रियाज जावेद पिंजारी हा तरुण माणुसकीच्या भावनेतून अतुल पवार यास वाचविण्यास गेला होता. त्यामुळे पिंजारी यांच्या कुटुंबियांना सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून  आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी  सभागृहात केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर विशेष बाब म्हणून पिंजारी  कुटुंबीयांना आमदार अमोल खताळ हे आर्थिक मदत मिळवून देतील असे ही माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी सांगितले.
Visits: 177 Today: 2 Total: 1423911

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *