शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजार समितीतच विकावा : सभापती खेमनर

नायक वृत्तसेवा, साकुर
संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागात सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची पिके घेत असून बाहेरील व्यापारी शेतकऱ्यांना कमी भाव देवुन गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला आपला शेतीमाल बाजार समितीतच विकावा असे आवाहन संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर यांनी केले आहे.

बाहेरील व्यापाऱ्यांच्या अमिषाला संगमनेर तालुक्यातील शेतकरी बळी पडतात. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या घटना समोर असताना सुद्धा काही अनोळखी व्यापारी थेट शेतकऱ्यांना जास्त भावाचे आमिष दाखवून माल घेवुन फसवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल हा बाजार समितीतच विकावा, जे ने करून फसवणूक होणार नाही.

Visits: 166 Today: 2 Total: 1106499
