निमगाव जाळीत थोरात गटाचा विखेंना जोरदार धक्का! तालुक्यातील 25 ग्रामपंचायती थोरातांकडे; आठ जागी विखें गटाचा झेंडा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायत सदस्य व सरपंचपदाची निवड अंतिम टप्प्यात आली असून सातव्या फेरी अखेरपर्यंत 33 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. आत्तापर्यंत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने तालुक्यातील आपले प्राबल्य कायम राखतांना 25 ग्रामपंचायती पटकावल्या आहेत. तर, विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाला आठ ठिकाणी यश मिळाले आहे. सकाळी विखेंनी जोर्वे ग्रामपंचायतीची जागा पटकावून थोरातांना धक्का दिल्यानंतर आता निमगाव जाळीची जागा पटकावित थोरातांनी त्याची परतफेड केली आहे.

आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाच्या ज्योती पवार (खराडी), सुनिता शिंदे (वाघापूर), शांताबाई कुदनर (जांभुळवाडी), बाबाजी गुळवे (रणखांबवाडी), आनंदा दुगुर्डे (दरेवाडी), सोनीली शेटे (जांबुत), रोहिणी भागवत (कर्जुले पठार), नारायण मरगळ (पिंपरणे), सुरेखा खेमनर (अंभोरे), गिरीजा साबळे (ओझर खुर्द), लता खताळ (धांदरफळ खुर्द), उज्ज्वला देशमाने (धांदरफळ बु.), गायत्री माळी (चिकणी), पांडूरंग सुपेकर (वडझरी खुर्द),

कमल कांगणे (हंगेवाडी), बाळासाहेब आहेर (करुले), शशीकला पवार (निळवंडे), अर्चना भुसाळ (उंबरी बाळापूर), विलास सोनवणे (चिंचोली गुरव), संध्या गोर्डे (वडझरी बु.), पुष्पा गुंजाळ (कोळवाडे), प्रतिभा जोंधळे (निमगाव जाळी), दिनकर सोनवणे (साकुर) व बिनविरोध सरपंच निवड झालेल्या निलम पारधी (सायखिंडी), मंगल काकड (डोळासणे) आदी चोवीस विजयी उमेदवारांनी थोरात गटाला त्या-त्या गावच्या ग्रामपंचायती मिळवून दिल्या आहेत.

तर विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाने यंदा संगमनेर तालुक्यात जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत असून तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींचे शिर्षपद पटकावले आहे. त्यात सुवर्णा दिघे (कोल्हेवाडी), सुवर्णा घुगे (मालुंजे), भगीरथाबाई काठे (निंबाळे), प्रिती दिघे (जोर्वे), संदीप देशमुख (निमोण), नाराय गुंजाळ (सादतपूर), सविता शिंदे (रहिमपूर), ज्योती पचपींड (कणकापूर) आदींचा समावेश आहे.

