दूधगंगा पतसंस्थेकडून वह्यांचे मोफत वाटप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकार क्षेत्रातील अग्रगण्या असणार्या दूधगंगा पतसंस्थेने कायमच सभासदांचे हित जोपासत सामाजिक उपक्रम राबवलिे आहेत. त्यानुसार सभासदांच्या पाल्यांना नुकतेच मोफत वह्यांचे वाटप पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे व दूध संघाचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मण कुटे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कारखान्याचे युवा संचालक दादासाहेब कुटे, सुकेवाडीच्या सरपंच योगिता सातपुते, उपसरपंच सुभाष कुटे, माजी सरपंच वैभव सातपुते, राजेंद्र कुटे, विलास प्र. सातपुते, भाऊसाहेब सातपुते, दशरथ सातपुते, पोपट महाराज आगलावे, शहाजी पानसरे, भारत पडवळ, तात्याराम कुटे, संपत अरगडे, सुभाष मा. कुटे, गोरख सी. सातपुते, गण्याबापू कुटे, रामनाथ काशिद, बाबुराव सातपुते, सौ.घुले, सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.
Visits: 75 Today: 2 Total: 1109624
