रोजगार उपलब्धतेसाठी प्रयत्न करु ः मदने
रोजगार उपलब्धतेसाठी प्रयत्न करु ः मदने
नायक वृत्तसेवा, नगर
रोजगार निर्माण परिषदेच्या आणि सरपंच सेवा संघ महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत, तालुका पातळीवर स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मेळावे, प्रशिक्षण, जनजागृती करणार असल्याची माहिती बाबुराव मदने यांनी दिली.

विविध महामंडळांच्या योजनांची माहिती उपलब्ध करून राज्यभर तरुणांना स्फूर्ती देणार्या प्रकल्पाची उभारणी. तसेच तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून महाराष्ट्रातील तरुणांना याबाबत मार्गदर्शन, सहकार्य, विविध योजनांबाबत कर्ज, अनुदान मिळवून देण्याबाबत प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास बाबुराव मदने यांनी बाबासाहेब पावसे यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केला आहे. रोजगार निर्माण परिषदेचे मदने यांच्या शिष्टमंडळाने संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील सरपंच सेवा संघाचे पावसे यांची नुकतीच समक्ष भेट घेऊन संवाद साधला आहे.
