अकोले एसटी आगारात पाच बस दाखल आ.लहामटें यांच्या हस्ते लोकार्पण 

नायक वृत्तसेवा, अकोले 
 येथील एस.टी. बस आगारात नवीन पाच एस.टी. बस दाखल झाल्या. गत दोन महिन्यांत दहा नव्या बस अकोले आगार प्रशासनास मिळाल्या आहेत. यामुळे प्रवासी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांचे प्रमुख उपस्थितीत शनिवारी नवीन आलेल्या पाच बसेसचे विधिवत लोकार्पण करण्यात आले.
गेल्या काही वर्षांत नवीन बस अकोले आगाराला मिळाल्या  नव्हत्या. मात्र आ. लहामटे यांच्या प्रयत्नाने दोन महिन्यात दहा नव्या बस मिळाल्या. अकोलेच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला. भविष्यात प्रवाशांच्या दृष्टीने तालुक्यातील एस.टी. वाहतूक व्यवस्था अधिक सुधारण्यासाठी व एस.टी. बस आगाराच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील, असा विश्वास आ.डॉ. लहामटे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी साथी विनय सावंत, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अक्षय आभाळे, आगार व्यवस्थापक सुरेश दराडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी, राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष वसंत मनकर, कृऊबाचे सभापती भानुदास तिकांडे, ईश्वर वाकचौरे, महिला आघाडीच्या नीता आवारी, सचिन वाकचौरे, तानाजी देशमुख,रेडेचे  सरपंच प्रशांत बंदावणे, उज्ज्वला राऊत आदी उपस्थित होते.
Visits: 188 Today: 1 Total: 2056052

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *