तांदळाच्या काळाबाजाराची तातडीने चौकशी करा :   शेणकर

नायक वृत्तसेवा, अकोले 
आदिवासी बहुल दक्षिण भागातील खेतेवाडी, मोरवाडी गावातील नागरिकांसाठी दोन ट्रक मालमोटारीमधून तांदूळ स्वस्त धान्य  दुका‌नात नेण्यात येत होता, मात्र यापैकी एक धान्याची मालमोटार विनापरवाना अकोले विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या गोदामात ऐनवेळेस खाली करण्यात आली. या तांदळाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अकोले विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक व ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय शेणकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन शेणकर यांनी निवासी नायब तहसिलदार किसन लोहरे यांना दिले.
शेतकरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अकोले आदिवासी तालुक्यामध्ये खेतेवाडी, मोरवाडी गावातील नागरिकांसाठी जाणारा  ७०.४० क्विंटल वजनाच्या रेशनचा  तांदळाचा काळाबाजार होत असतानाच अकोल्यातील सजग सामाजिक नागरीक कार्यकत्यांनी  सतर्कता ठेऊन यातील खरा प्रकार उघडकीस आणला.
या बाबत संबंधित पुरवठा अधिकारी, ठेकेदार व कर्मचाऱ्यांची सविस्तर चौकशी होवुन तातडीने गुन्हे दाखल करावेत, या पूर्वी अनेक वेळा रेशनचा काळाबाजार घडलेला आहे.याची त्वरीत गांभीर्याने दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ग्राहक पंचायतचे मच्छिंद्र मंडलिक, दत्ता शेणकर, महेश नवले, प्रमोद मंडलीक, दत्ता ताजणे, राम रुद्रे, भाऊसाहेब वाकचौरे आंदीची नावे आहेत.निवेदनाच्या प्रती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ,  जिल्हाधिकारी यांना ईमेल व पोष्टव्दारे देण्यात आल्या आहेत.
Visits: 107 Today: 1 Total: 1114350

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *