साई आदर्श मल्टीस्टेट राज्यातील आदर्श पतसंस्था : शालिनी विखे पाटील

नायक वृत्तसेवा, आश्वी
साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेने ठेवीदार, सभासदांच्या हिताचे घेतलेले निर्णय कौतुकास्पद असून साई आदर्श मल्टीस्टेट राज्यातील आदर्श पतसंस्था असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी काढले.

राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथे राहुरीच्या साई आदर्श मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखेचे स्थलांतर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील, श्री वरद विनायक सेवाधाम,लोणी तथा नारायणगिरी आश्रम सुरेगाव नेवासा येथील महंत उध्दव महाराज मंडलिक यांच्या हस्ते झाले, यावेळी शालिनी विखे बोलत होत्या.यावेळी चेअरमन शिवाजी कपाळे,संगिता कपाळे, विखे कारखान्याचे संचालक सुनील तांबे, गोरक्षनाथ तांबे,विजय म्हसे, सरपंच तात्यासाहेब सातपुते, उपसरपंच नकुल तांबे, अँड. भानुदास तांबे, भाजप कोल्हार मंडलचे अध्यक्ष योगेश तांबे, भाऊसाहेब पाळंदे, भगवान झनान, अशोक गाडेकर, विजय तांबे, संजय गाडेकर, पांडुरंग बनसोडे, भारत महाराज धावणे, बाबा महाराज मोरे, रामचंद्र काळे, किशोर थोरात, अंबिका महिला पतसंस्थेच्या सुशीला नवले, संजय शिंगवी, डॉ. विलास पाटील, अविनाश साबरे, दीपक त्रिभुवन, प्रकाश सोनी, सचिन जाधव, धीरज कपाळे, दत्तात्रय दरदंले, माजी सरपंच पुनम तांबे, पुष्पा आंधळकर व साई आदर्श परिवाराचे सदस्य उपस्थित होते. उध्वव महाराज मंडलिक म्हणाले, साई आदर्श मल्टीस्टेटने लोकांचा विश्वास संपादन केला असून संस्थेचे कामकाज आदर्श मार्गावर सुरू आहे.

साई आदर्श मल्टीस्टेटच्या अहिल्यानगर जिल्ह्यात १८ शाखा असून यापैकी ९ शाखा या संस्थेच्या मालकीच्या जागेत आहेत. तर लवकरच पुणे व मध्यप्रदेश येथे ही शाखेंचे उद्घाटन होणार आहे. मार्च २०२५ अखेर २७३ कोटींचा समिंश्र व्यवसाय झाला असून १६८ कोटी ठेवी तर १०५ कोटींचे कर्ज वाटप असल्याचे संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजी कपाळे यांनी सांगितले.

Visits: 378 Today: 3 Total: 1107007
