चंदीगडच्या तृतीयपंथीयांकडून साईंना अकरा लाखांची देणगी

नायक वृत्तसेवा, शिर्डी
चंदीगड येथील तृतीयपंथी समाजाच्या साईभक्त सोनाक्षी व त्यांच्या 10 सहकार्‍यांनी नुकतीच श्री साईबाबा संस्थानला रोख स्वरुपात 11 लाख रुपये देणगी दिली आहे. याप्रसंगी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी त्यांचा सत्कार करुन आभार मानले.

यावेळी साईभक्त सोनाक्षी व त्यांच्या 10 सहकारी म्हणाल्या, आम्ही सर्व चंदीगड येथून अनेक ठिकाणी भेट देत-देत शिर्डी येथे आलेलो आहोत. श्री साईबाबांचे दर्शन घेऊन आम्हांला सर्वांना आत्मिक शांती मिळाली. आम्हाला याठिकाणी चांगली शिस्त बघायला मिळाली. श्री साईबाबा संस्थानच्यावतीने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अतिशय चांगल्याप्रकारे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सर्व साईभक्त मास्कचा वापर व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करताना दिसत आहेत. दर्शन व्यवस्थेबाबत कुणाची कुठलीही तक्रार नाही. संस्थानची ही व्यवस्था साईभक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताची असून सर्वांनी नियमांचे पालन करुन श्री साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे सांगून लवकरच कोरोनाचे सावट संपावावे अशी प्रार्थनाही सोनाक्षी व त्यांच्या सहकार्‍यांनी साईचरणी केली. सरदच्या साईभक्तांनी देणगी दिलेली असल्याने संस्थानकडून दर्शन आरतीचा मोफत पास उपलब्ध असूनही त्यांनी त्यास नम्रपणे नकार देत विहीत मार्गानेच दर्शनरांगेतून दर्शन घेणे पसंत केले. काही महिला भक्तांकडून दर्शन आरती व दर्शनासाठी देणगीची मागणी केली जाते या तथाकथीत बातमीच्या पार्श्वभूमीवर सदरची बाब निश्चितच स्पृहणीय आहे.

Visits: 89 Today: 1 Total: 1116403

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *