आई-वडिलांसह गुरुजनांचा आदर करा : पो.नि. थोरात 

नायक वृत्तसेवा, साकुर
विद्यार्थ्यांनी आयुष्य जगत असताना चांगल्या ची संगत ठेवावी. तसेच व्यसनाधीन मित्रांपासून दूर राहत आपल्यात काय आहे ते ओळखायला शिकले पाहिजे. हे करत असताना आई-वडिलांसह गुरुजनांचा आदर करा ज्ञान मंदिरात येताना आई-वडिलांच्या पायाला स्पर्श करून या, तुमचं भविष्य नक्कीच उज्वल असेल असे मत घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी व्यक्त केले.
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील विरभद्र विद्यालयात व्यसनमुक्ती दिन आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कामगार तलाठी शिवप्रसाद दिवेकर, पो. कॉ. प्रमोद गाडेकर, पत्रकार किरण पुरी,पत्रकार युनूस शेख, पत्रकार सहदेव जाधव,प्राचार्य बी.एम.खरात, पर्यवेक्षक आप्पा तुरकणे,  एस.के. खेमनर, जी.वाय.हजारे, डी.बी.ढमढेरे,  व्ही.एम. केदार, एम.ए.खेमनर,जे.बी.खेमनर,डी.के.खेमनर, प्रा.पाडेकर, श्रीमती शेख, श्रीमती केदार आदी मान्यवर उपस्थित होते.थोरात पुढे  म्हणाले, अंमली पदार्थामुळे विचार व वागणूकीवर परिणाम होतो. व्यसनाधीन लोक असं का करतात, हा प्रश्न नेहमी पडतो. जर घरातील एखादा व्यक्ती व्यसन करत असेल त्याला विचारा व्यसन का करता? तसेच तशी शपथ घ्यायला सांगा. विद्यार्थ्यांनी टिव्ही, मोबाईलकडे दुर्लक्ष करा.  शिक्षणासाठी सक्षम बनले पाहिजे. विद्यार्थ्यांनींनीही अभ्यास करून करिअर करा. करिअर आताच आहे, नंतर नाही. आज एखादी चूक झाली तर ती पुन्हा भरून येत नाही. एखादी गोष्ट चूकीची घडत असेल तर मला कळवा, त्याचा पुर्णपणे बंदोबस्त मी करीन त्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनींना हेमंत थोरात यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक व सुत्रसंचालन  जी.वाय. हजारे यांनी केले तर आभार प्रा. पाडेकर यांनी मानले. यावेळी शिक्षक गायकवाड, वीरकर, सोनवणे, श्रीमती सरमधे,श्रीमती शेख, श्रीमती वाघुंडे, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच विरभद्र विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त गावातून प्रभात फेरी काढली होती.
Visits: 64 Today: 1 Total: 1423243

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *