पाच हजार विद्यार्थ्यांना आ.खताळ यांच्याकडून शालेय साहित्याची भेट

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांना दिलेले शालेय साहित्य आ. खताळ यांनी मतदार संघातील प्रत्येक गावात आणि वाडीवस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सुमारे साडेचार ते पाच हजार गोरगरिब विद्यार्थ्यांना भेट दिले. आमदारांकडून शालेय साहित्य मिळाल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांचे चेहरे चांगलेच खुलेले होते.

शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असताना अनेक गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तर, पेन, पेन्सिल, खोडरबर कंपास पेटी यासारखे शालेय साहित्य खरेदी करणे अवघड झाले होते.अशा परिस्थितीत आपल्या मतदारसंघातील एकही विद्यार्थी शालेय साहित्य पासून वंचित राहू नये हा उदात्त हेतूने आमदार अमोल खताळ यांनी आपल्या जन्मदिवसाच्या निमित्त हारतुरे, पुष्पगुच्छ, शाल, केक नको, त्याऐवजी शालेय साहित्य दान करा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते.या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिक, शिक्षकवर्ग व सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य आणले होते. ते सर्व जमा झालेले शालेय साहित्य मतदार संघातील जिल्हा परिषद शाळांमधील गोर गरीब विद्यार्थ्यांपर्यंत कार्यकर्त्यांमार्फत पोहोचविण्यात आले.विशेष म्हणजे काही शाळांमध्ये साहित्य अपुरे पडू लागले ही माहिती आ. खताळ यांना समजताच त्यांनी स्वतःच्या पगारातून पन्नास हजार रुपये खर्च करत शालेय साहित्य पासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना वितरित केले.

गरिबीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून वाढदिवसानिमित्त आलेले शालेय साहित्य मतदार संघातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मार्फत वाटप केले. परंतु काही जिल्हा परिषदेच्या शाळा वंचित राहत असल्याचे कार्यकर्त्यांकडून मला समजले, त्यानंतर मी स्वतः माझ्या पगारातील ५० हजार रुपये खर्चून वंचित राहिलेल्या गोरगरीब मुलांना शालेय साहित्य भेट दिले असल्याचे आ. खताळ यांनी सांगितले.

Visits: 145 Today: 2 Total: 1105075
