राज्यमंत्री तनपुरेंनी दुचाकीवर जात बोंबलदरा येथे रोहित्राचे केले उद्घाटन!

राज्यमंत्री तनपुरेंनी दुचाकीवर जात बोंबलदरा येथे रोहित्राचे केले उद्घाटन!
अद्यापही पाड्यावर वीज पोहोचलेली नव्हती; ट्विटरवर भावना केल्या व्यक्त
नायक वृत्तसेवा, राहुरी
दूरवर जंगलात वसलेल्या बोंबलदरा या आदिवासी पाड्यावरील रोहित्राचे उद्घाटन करण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे थेट अरुंद रस्त्यावरून दुचाकीवर तेथे पोहोचले. या पाड्यावर अद्याप वीज पोहोचली नव्हती. त्यामुळे हे उद्घाटन खर्‍या अर्थाने समाधान देऊन गेल्याच्या भावनाही तनपुरे यांनी ट्वीट करीत व्यक्त केल्या आहेत.


राहुरी-संगमनेर सीमेवर दूरवर जंगलात वसलेल्या बोंबलदरा या आदिवासी पाड्यावर अद्याप वीज पोहोचली नव्हती. त्यामुळे तेथील नागरिकांच्या नशिबी कायमच अंधार असल्याचे चित्र होते. वीज नसल्यामुळे अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत होते. मात्र, आता येथे वीज पोहोचवण्यात राज्य सरकारला यश आले असून तेथील रोहित्राचे उद्घाटन राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते झाले. याबाबतचा अनुभवच मंत्री तनपुरे यांनी ट्विटवर शेअर केला आहे.


यामध्ये तनपुरे यांनी म्हटलं आहे की, ‘बोंबलदरा, अगदी कमी वस्ती असलेला माझ्या आदिवासी बांधवांचा पाडा. राहुरी-संगमनेर सीमेवर, दूरवर जंगलात वसलेल्या या आदिवासी वस्तीवर दुर्दैवाने अद्याप वीज पोहोचली नव्हती. आज मी स्वतः अरुंद वाटेवरून दुचाकीने प्रवास करत येथील रोहित्राचे उद्घाटन केले. मंत्री झाल्यापासून बरीच उद्घाटनं केली. मात्र बोंबलदरा येथील माझ्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात खर्‍या अर्थाने आज जो प्रकाश पडला आहे. तो मला मोलाचा वाटतो. त्या लख्ख प्रकाशात त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद मला खर्‍या अर्थाने समाधान देऊन गेला.’ दरम्यान, ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करतानाच तनपुरे यांनी त्यासोबत एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे.

Visits: 172 Today: 1 Total: 1914464

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *