गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना

गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील आठवाडी परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली होती. यातील आरोपींनाही पोलिसांनी अटक केली. परंतु याचे थेट राहाता कनेक्शन असल्याचे उघड झाले. त्यानंतर संगमनेरमध्येही त्याची व्याप्ती पोहोचली. तेथेही लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात अटक करण्यात आलेल्या करीम शेखसह यापूर्वीच्या सर्व आरोपींना काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींच्या शोधासाठी श्रीरामपूर पोलिसांची दोन पथके जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पाठविण्यात आली आहेत.


याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट गुटखा प्रकरणाचा तपास जलदगतीने करीत आहे. आत्तापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी पसार असून त्यांच्या शोधासाठी काल गुजरातला एक पथक रवाना झाले होते. मात्र ते रिकाम्या हाताने परत आले. त्यानंतर पुन्हा या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पाठविण्यात आली आहे.

Visits: 201 Today: 1 Total: 1914076

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *