राहाता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी सदाफळ

राहाता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी सदाफळ
नायक वृत्तसेवा, राहाता
येथील हेमंतकुमार सदाफळ यांची नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राहाता शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.


अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवनात पार पडलेल्या जिल्हा आढावा बैठकीत हेमंतकुमार सदाफळ यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राहाता शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष किशोर मासाळ, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे, राहाता तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, विद्यार्थी सेनेचे गणेश गोंदकर, भगवान टिळेकर, शशीकांत लोळगे, संदीप सोनवणे, प्रसाद पाटील, साई कोतकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के, जिल्हा सरचिटणीस शशीकांत लोळगे, तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के, शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, गणेश कारखान्याचे माजी संचालक भगवान टिळेकर आदिंनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Visits: 118 Today: 1 Total: 1107837

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *