देवस्थाने खुली करा; पुरोहित संघाची मागणी

देवस्थाने खुली करा; पुरोहित संघाची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरलेल्या ठिकाणची देवस्थाने खुली करावी, अशा मागणीचे निवेदन संगमनेर पुरोहित संघाने नुकतेच प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांना दिले आहे.


सदर निवेदनात पुरोहित संघाने म्हंटले आहे की, राज्यातील ज्या ठिकाणचा कोविड प्रादुर्भाव ओसरला आहे, अथवा नगण्य आहे. अशा ठिकाणची देवस्थाने भाविकांसाठी खुली करावीत. एकीकडे सर्व क्षेत्र खुली केली असताना देवस्थाने बंद ठेवल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. पुरोहित संघाने कोविड संकटात कोविड योद्धा म्हणून भूमिका निभावली असून जनजागृती केली आहे. त्यामुळे देवस्थाने भाविकांसाठी खुली केली तर नक्कीच नियमांचे पालन करतील, असा विश्वास व्यक्त करुन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. यावेळी पुरोहित संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Visits: 163 Today: 1 Total: 2057489

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *