साईनगरीत रंगपंचमी उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा श्रींच्या रथाची पालखी मार्गाने मिरवणूक; भाविकांसह ग्रामस्थांचा लक्षणीय सहभाग

नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईनगरीत शंभराहून जास्त वर्षाची परंपरा असलेला रंगपंचमी उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. या उत्सवात जगभरातून सर्वधर्मीय भाविक सहभागी झाले होते. मनामनातील मतभेद विसरून एकतेचा रंग येऊदे असे साकडे श्री साईबाबांना घालण्यात आले असून विविध रंगांसह गुलालाची उधळण श्रींच्या रथावर करण्यात आली.

करोनामुळे दोन वर्षांपासून खंडित झालेली शंभर वर्षाची साईसंस्थानची रंगपंचमी उत्सवाची परंपरा मंगळवारी रंगपंचमी निमित्ताने सायंकाळी पाच वाजता पुन्हा मोठ्या जल्लोषात सुरू झाली. यावेळी श्री साईबाबा संस्थानच्यावतीने श्रींच्या रथाची पालखी मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी द्वारकामाईतून साईबाबांच्या पादुका व सटका यांची रथातून केशरमिश्रीत पाणी शिंपडून वाजतगाजत यात्रा काढण्यात आली. यावेळी रंगीबिरंगी रंगांची उधळण करण्यात आली.

याप्रसंगी साई संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, अ‍ॅड. अविनाश दंडवते, अ‍ॅड. सुहास आहेर, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, सचिन तांबे, रवींद्र गोंदकर, संजय शिंदे, ताराचंद कोते, सचिन कोते, गजानन शेर्वेकर, सर्जेराव कोते, नितीन कोते, गणेश कोते, तान्हाजी गोंदकर, सदाशिव गोंदकर, सुनील परदेशी, विशाल भडांगे, कानिफ गुंजाळ, पंडित गुडे, विकास गोंदकर, वैभव कोते आदिंसह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 219 Today: 1 Total: 1983840

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *