राहुरी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त; नऊ जणांना अटक


नायक वृत्तसेवा, राहुरी
कोळेवाडी घाटात मंगळवारी (ता.9) पहाटे दरोड्याच्या तयारीत असलेल्या एक महिला, एक अल्पवयीन मुलासह नऊ जणांच्या टोळीला ग्रामस्थांच्या मदतीने राहुरी पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संभाजी शिवाजी पाटील (वय 34, रा. देड, ता. शिराळ, जि. सांगली), राहुल लहू डोंगरे (वय 32, रा. मातेगाव, जि. बीड), सोमनाथ शिवराम आगिवले (वय 30), तुळशीराम दामू मेगाळ (वय 35,) बाळू शिवराम आगिवले (वय 21), अंकुश लक्ष्मण मेगाळ (वय 25, चौघेही रा. ठाकूरवाडी, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद), अमोल संपत शिंदे (वय 33), कल्पना अमोल शिंदे (वय 25, दोघेही रा. खांबे, ता. संगमनेर), एक अल्पवयीन मुलगा (रा. गेवराई, जि. बीड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कोळेवाडी घाटात काहीजण दरोड्याच्या तयारीत असल्याची खबर पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चारूदत्त खोंडे, पोलीस नाईक रामनाथ सानप, चालक खेडकर यांच्या पथकाने ग्रामस्थांची मदत घेऊन घटनास्थळी छापा घातला. पोलीस पथक पाहून अंधारात लपलेल्या आरोपींनी पळ काढला. त्यांचा पाठलाग करून ग्रामस्थ व पोलीस पथकाने नऊ जणांना ताब्यात घेतले.

Visits: 157 Today: 1 Total: 1988411

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *