नव्या कृषी विधेयकाची अकोलेत होळी

नव्या कृषी विधेयकाची अकोलेत होळी
नायक वृत्तसेवा, अकोले
केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी विधेयकाची अकोलेत शुक्रवारी (ता.25) होळी करण्यात आली. यावेळी तालुक्यातील माकप, भाकप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्र सेवा दल व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकर्‍यांनी मोदी सरकारच्या कृषी धोरणाचा जाहीर निषेध केला.


शुक्रवारी दुपारी मार्क्सवादी किसान सभेचे राज्य सचिव डॉ.अजित नवले व राष्ट्रवादीचे आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील वसंत मार्केटसमोर विधेयकाची होळी करण्यात आली. यानंतर मोर्चा तहसील कचेरीवर नेण्यात आला. यावेळी कॉ.कारभारी उगले, अ‍ॅड.शांताराम वाळुंज, विनय सावंत, मच्छिंद्र धुमाळ, चंद्रकांत नेहे, महेश नवले यांची भाषणे झाली आणि तद्नंतर निवेदन देण्यात आले.

Visits: 171 Today: 1 Total: 2061159

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *