देशासाठी दीनदयाळ उपाध्याय यांचे मोठे योगदान ः पिचड

देशासाठी दीनदयाळ उपाध्याय यांचे मोठे योगदान ः पिचड
नायक वृत्तसेवा, अकोले
21 व्या शतकात भारताला जागतिक स्तरावर एक नवी उंची देण्यासाठी, 130 कोटींहून अधिक भारतीयांचे जीवन चांगले बनवण्यासाठी आज जे काही होत आहे, त्यात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचे मोठे योगदान आहे. आपल्या देशातील शेतकरी, श्रमिक, तरूण, मध्यम वर्गाच्या हितासाठी अनेक चांगले आणि ऐतिहासिक निर्णय घेतले गेले; असे उद्गार माजी आमदार वैभव पिचड यांनी राजूर येथे बोलताना काढले.


पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार घालून तसेच कार्यक्रमापूर्वी वृक्षारोपण करून उपस्थितांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी मंगलदास भवारी, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, यशवंत आभाळे, वकील वसंत मनकर यांनी मनोगत व्यक्त केले. राजूरसह तालुक्यात भारतीय जनता पक्ष कार्यालयात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, प्रा. एम. एम. भवारी, भरत घाणे, माधव गभाले, विठ्ठल भवारी, सी. बी. भांगरे, भरत घोरपडे, पांडुरंग खाडे, सुनील सारोक्ते आदिंनी प्रतिमा पूजन केले. शनि गल्लीत ग्राहक पंचायतच्यावतीने आयोजित मच्छिंद्र मंडलिक, शिवसेना नगरसेवक प्रमोद मंडलिक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामहरी तिकांडे आदिंनी पूजन केले. नगराध्यक्षा संगीता शेटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेविका सोनाली नाईकवाडी, धनंजय संत, नितीन जोशी, हितेश कुंभार, बबलू धुमाळ, मच्छिंद्र चौधरी, अनिल कोळपकर, दत्ता ताजणे यांनी आपापल्या प्रभागात प्रतिमा पूजन केले. धुमाळवाडीमध्ये ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ, सरपंच डॉ.रवींद्र गोर्डे, वीरगावमध्ये भाजपचे जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, कळस बु. येथे भाऊसाहेब वाकचौरे, नामदेव निसळ, सुलतानपूरमध्ये सुभाष कानवडे, कळस खुर्दला सुरेश पथवे, राजू सावंत, सुगाव येथे लता देशमुख, संदीप देशमुख, परखतपूरमध्ये सुशांत वाकचौरे, ढोकरीमध्ये ज्ञानेश पुंडे, ब्राम्हणवाडा येथे शारदा गायकर, डोंगरगावमध्ये सुनील उगले, रवी घुले, लहितला रेश्मा गोडसे, अमोल गोडसे आदिंनी प्रतिमा पूजन करुन अभिवादन केले.

Visits: 16 Today: 1 Total: 116392

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *