छोटा हत्तीच्या अपघातात एक ठार सहा गंभीर जखमी माळवाडी परिसरातील घटना; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

नायक वृत्तसेवा, घारगाव
जेजुरीला देवदर्शनासाठी जात असताना छोटा हत्तीला अपघात झाल्याची घटना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी (ता.संगमनेर) शिवारात आज (सोमवार ता.14) पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एक ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण नाशिक जिल्ह्यातील पंचवटी येथील रहिवासी आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, चालक वैभव योगेश गिरी (वय 25), आकाश दत्ता खोडे (वय 21), पूजा दत्तात्रय खोडे (वय 23), प्रिया शरद आंबेकर (वय 23), चेतन गणेश शिंदे (वय 10), ताराबाई दत्तात्रय खोडे (वय 35), जनाबाई पुंडलिक खोडे (वय 65) हे सर्वजण नाशिक जिल्ह्यातील पंचवटी येथील रहिवासी आहेत. ते नाशिक येथून जेजुरीला देवदर्शनासाठी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने जात होते.

दरम्यान, सोमवारी पहाटे बोटा शिवारातील माळवाडी येथे आले असता त्यांच्या छोटा हत्तीला अपघात झाला. हा अपघात झाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व जखमींना टेम्पोतून बाहेर काढले. त्यानंतर औषधोपचारार्थ माऊली अ‍ॅक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारांदरम्यान जनाबाई खोडे यांचा मृत्यू झाला आहे. तर वरील सहा जणांवर उपचार सुरू आहेत. न या अपघातात छोटा हत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.

Visits: 204 Today: 1 Total: 1913382

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *