माहुली येथील पाझर तलावात आढळला मृतदेह

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या माहुली येथील पाझर तलावात पिंपळगाव खांड (ता.अकोले) येथील गणेश तुकाराम घोडेकर (वय 35) यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गणेश घोडेकर हे भाऊबीजेच्या दिवशी माहुली येथील शंकर नाथा वाकचौरे या पाहुण्यांकडे आले होते. त्यानंतर कामाला जातो म्हणून ते सांगून गेले होते. मंगळवारी (ता.9) सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना परिसरातील नागरिकांना दिसून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक फौजदार राजू खेडकर, गणेश लोंढे, राजेंद्र लांघे, रामनाथ कजबे, पोलीस पाटील कुंडलिक साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम कजबे आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रुग्णवाहिकेला बोलावून गणेश घोडेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी शंकर वाकचौरे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करत आहे.

Visits: 202 Today: 1 Total: 2121025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *