ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर 125 जागा; संगमनेरातील 16 तर अकोलेतील 52 ग्रामपंचायतींचा समावेश

नायक वृत्तसेवा, संगमनेर
निधन, राजीनामा, अनर्हता व इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या 125 ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी जिल्ह्यातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. संगमनेर व अकोले तालुक्यातील 68 ग्रामपंचायतींचा समावेश असून, 21 डिसेंबरला मतदान होणार असल्याची माहिती संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार संगमनेर तालुक्यातील आश्वी, बोरबन, खराडी, कोंचीमांची, कुरकुटवाडी, म्हसवंडी, मिरपूर, निमगाव जाळी, निमगाव टेंभी, पळसखेडे, समनापूर, वडगाव लांडगा, मिर्झापूर, चिंचपूर, काकडवाडी, ओझर खुर्द अशा एकूण 16 ग्रामपंचायतींमधील 19 सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. तर अकोले तालुक्यातील घोडसरवाडी, इंदोरी, धामणगाव पाट, कळंब, लिंगदेव, भोळेवाडी, जायकवाडी, देवगाव, साकीरवाडी, घाटघर, भंडारदरा, जहागिरदरावाडी, शेंडी, बारी, साम्रद, मुतखेल, गुहिरे, शिसवद, कुमशेत, पाचनई, अंबित, पेंडशेत, शिंगणवाडी, पैठण, वाडी, रेडे, पिंपळगाव नाकविंदा, दिगंबर, आंबेवंगण, शेलविहिरे, जायनावाडी बिताका, एकदरे, लाडगाव, कोकणवाडी, पाचपट्टावाडी, खडकी खु., शिळवंडी, घोटी, कोहणे, सोमलवाडी, पेडेवाडी, चंदगीरवाडी, पिंपळदरावाडी, पिंपळगाव निपाणी, ब्राम्हणवाडा, शेरणखेल, चैतन्यपूर, कौठवाडी, मन्याळे, मुरशेत, तिरडे, वीरगाव अशा एकूण 52 ग्रामपंचायतींमधील 106 सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत.


या निवडणुकांसाठी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 यादिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 वेळेत तहसील कार्यालयातून नामनिर्देशनपत्रे प्राप्त होतील व उमेदवारी अर्जही दाखल करता येईल. 7 डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. 9 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल. त्याचदिवशी निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वितरण करण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत मतदान होणार आहे. 22 डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ही प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांनी दिली आहे.

Visits: 119 Today: 1 Total: 1573752

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *