आंतरराष्ट्रीय पातळीवर लखन गुंजाळला सुवर्णपदक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आंतरराष्ट्रीय पातळीवरील 19 वर्षाखालील स्पर्धकांची 10 किलोमीटर धावण्याची स्पर्धा नुकतीच नेपाळची राजधानी काठमांडू येथे पार पडली. यामध्ये संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील लखन पांडुरंग गुंजाळ याने 10 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत सुवर्णपदक पटकावले.

आशिया खंडातील सुमारे 500 स्पर्धकांनी धावणे, कबड्डी, स्विमिंग, कराटे इत्यादी स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत लखन गुंजाळ याने दमदार कामगिरी केली. त्याने 42 मिनिटात 10 किलोमीटर अंतर पार करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. यापूर्वीही त्याने राष्ट्रीय पातळीवरील धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवले आहे. संगमनेर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील लखन गुंजाळ याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, विलास गुंजाळ, बाळासाहेब अरगडे, नंदकुमार अरगडे तसेच तळेगाव भागातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

Visits: 178 Today: 1 Total: 1917350

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *