71 दिवसांत साईंच्या झोळीत 32 कोटींचे दान

नायक वृत्तसेवा, शिर्डी
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शिर्डीतील साईबाबा मंदिर 16 नोव्हेंबरपासून भाविकांसाठी खुले झाले. त्यानंतरच्या 71 दिवसांत सुमारे 12 लाख 2 हजार 192 भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. या 71 दिवसांमध्ये शिर्डी संस्थानला तब्बल 32 कोटी 3 लाख 43 हजार 900 रुपयांचे भरभरुन दान प्राप्त झाले असल्याची माहिती साईसंस्थानकडून मिळाली आहे.

शिर्डीचे साई मंदिर हे देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. कोविड महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन झाला. यानंतर मिशन बिगीन अगेन अंतर्गत नियमांमध्ये शिथिलता आणली आणि काही गोष्टी सुरु झाल्या. देशभरातील काही मंदिरे सुरु झाली तरी महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे बंद होती. त्यानंतर धार्मिक स्थळे उघडण्यासाठी राज्यात आंदोलने झाली. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं खुली करण्यास परवानगी दिली. त्यानंतर मंदिरांमध्ये नियमांचे पालन करत दर्शनाला सुरुवात झाली. आणि साईबाबा मंदिर 16 नोव्हेंबरपासून भाविकांसाठी खुले झाले. भाविकांनी दर्शनावेळी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केल्याचेही संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सांगितले.

असे जमा झाले दान…
रोख देणगी ः 6 कोटी 18 लाख 70 हजार 361
मनीऑर्डर ः 50 लाख 71 हजार 979
ऑनलाईन देणगी ः 6 कोटी 39 लाख 1 हजार 896
डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे देणगी ः 2 कोटी 62 लाख 28 हजार 326
चेक, डीडीद्वारे देणगी ः 3 कोटी 5 लाख 89 हजार 626
परकीय चलन ः 22 लाख 60 हजार 165
दक्षिणा पेटीतील देणगी ः 13 कोटी 4 लाख 20 हजार 547
एकूण प्राप्त देणगी ः 32 कोटी 3 लाख 42 हजार 900
सोने आणि चांदी ः 796 ग्रॅम सोने आणि हजार ग्रॅम चांदी

Visits: 160 Today: 2 Total: 1778735

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *