पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर पोहेगाव ग्रामस्थांनी उपोषण सोडले अवैध धंदे बंद करणे आणि पोहेगाव पोलीस दूरक्षेत्र चालू ठेवण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील पोहेगाव पोलीस दूरक्षेत्र कायमस्वरूपी चालू ठेवून अवैध धंदे पूर्ण बंद करण्यासाठी सरपंच अमोल औताडे व उपसरपंच प्रशांत रोहमारे यांच्यासह ग्रामस्थ पोहेगाव पोलीस दूरक्षेत्रासमोर आमरण उपोषणासाठी बसलेले होते. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत पोहेगाव पोलीस दूरक्षेत्र नियमित सुरू ठेवून अवैध धंदे करणार्‍यांविरोधात हद्दपारीची कारवाई करू यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असे लेखी आश्वासन देत उपोषण सोडण्याची विनंती केली. यानंतर सरपंच औताडे व ग्रामस्थांनी उपोषण सोडले.

शिवसेना नेते नितीन औताडे यांनी पोहेगाव परिसरात वाढलेले अवैध धंदे व चोर्‍या रोखण्यासाठी सातत्याने पोहेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी प्रयत्न केले आहे. पोलिसांनी अवैध धंदे करणारांच्या मुसक्या वेळेत आवळल्या तर त्यांना चाप बसेल. वेळप्रसंगी पोलिसांना आम्ही नेहमीच साथ देऊ, असे सांगून शिर्डी पोलीस ठाण्याने पोहेगाव पोलीस दूरक्षेत्र नियमित सुरू ठेवले पाहिजे, असे सांगितले.

सरपंच अमोल औताडे यांनी पोलीस ठाण्याला दिलेल्या लेखी आश्वासनाचे वाचन केले. यावेळी उपसरपंच प्रशांत रोहमारे, अशोक नवले, दादासाहेब औताडे, तुषार औताडे, निवृत्ती औताडे, अशोक औताडे, राजेंद्र औताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दामले, पोलीस नाईक अविनाश मकासरे, कैलास राठोड, के. ए. औताडे, प्रकाश रोहमारे, सचिन शिंदे, संतोष भालेराव, बाबासाहेब अभंग, संदीप औताडे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, बाबुराव वाघ, विशाल कांबळे, अशोक भडांगे, सुनील लोखंडे, बाळासाहेब औताडे, अरुण डोके, प्रमोद भालेराव, योगेश पानगव्हाणे, रवींद्र औताडे, वसंत औताडे, सुभाष माळी, संभाजी औताडे, विनायक मुजमुले, दीपक औताडे आदी उपस्थित होते. शेवटी उपसरपंच प्रशांत रोहमारे यांनी आभार मानले.

Visits: 130 Today: 1 Total: 1114027

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *