उपक्रमशील शिक्षकांमुळे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावला ः डॉ.कळमकर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिक्षक आपली प्रतिभा वापरुन प्राथमिक शाळेत विद्यार्थीहिताचे अनेक कल्पक उपक्रम राबवत आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द साहित्यिक व शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर यांनी केले.
संगमनेर तालुका गुरुकुल मंडळ व शिक्षक समितीने विविध संस्थांकडून आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान केला. याप्रसंगी अध्यक्षपदावरून कळमकर बोलत होते. जिल्हा परिषदेचे गटनेते अजय फटांगरे, समितीचे राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी, गटशिक्षणाधिकारी के. के. पवार, गुरुकुल महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वृषाली कडलग, गुरुकुलचे जिल्हा कार्याध्यक्ष सुखदेव मोहिते, मच्छिंद्र दळवी, गोकुळ कहाणे, संभाजी फड, मधुकर मैड, बंडू हासे, ज्ञानेश्वर नागरे, भागवत कर्पे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पुरस्कार कुठला आहे याला महत्त्व नसते. त्यातून आपली काम करण्याची दिशा योग्य आहे ते समजते आणि प्रेरणा मिळते. स्वत:चे पैसे घालून शिक्षक आपल्या शाळा अंर्तबाह्य देखण्या करत आहेत ग्रामीण भागासाठी ही दिलासादायक गोष्ट असल्याचे डॉ.कळमकर म्हणाले. विश्वास ठेवला की शिक्षक जोमाने काम करतात याचा मला अनुभव आहे, असे जिल्हा परिषद सदस्य फटांगरे म्हणाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश आहेर, गोरक्ष हासे, शिवाजी नागरे, ज्ञानेश्वर नागरे, भास्कर मोहिते, श्रीकांत साळवे, उत्तम गायकवाड, विठ्ठल कडूसकर, सोमनाथ मदने, भास्कर हासे, श्रीकांत बिडवे, सुनील टकले, संजय कानवडे, सचिन अंकाराम, राजाराम कानवडे, विलास वाकचौरे, मीना साबळे, प्रतिभा नागरे, छाया करकंडे, प्रमिला हासे, राम हांडे, संजय नवले, अमोल जाधव, प्रशांत बैरागी, राजू हासे, किरण कटके, प्रशांत भंडारे, बाबासाहेब गायकवाड आदिंनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन अक्षय खतोडे यांनी केले. आभार गोकुळ कहाणे यांनी मानले.
गटशिक्षणाधिकारी के. के. पवार, वृषाली कडलग, हरिबा चौधरी, स्मिता जाधव, सुषमा धुमाळ, अशोक शेटे, प्रीती खालकर, ज्योती भोर, कैलास वाघमारे, दत्तू आव्हाड, उमेश काळे, कैलास भागवत, युवराज भाईक, यादव धांडे, शाईन शेख, बाळासाहेब भागवत, मंगल रहाणे, ज्योती घोडे यांचा सत्कार झाला.