यश जाजूचे सीए परीक्षेत सुयश

नायक वृत्तसेवा, संगमनेर
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या सीएच्या (आयपीसीसी) प्रथम व द्वितीय ग्रुपमध्ये यश अजय जाजू याने सुयश प्राप्त केले.

मुक्त पत्रकार तथा अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे सचिव अजय जाजू यांचा यश हा सुपुत्र आहे. आपल्या यशाचे श्रेय तो आपल्या आईवडीलांसह शिक्षकांना देतो. यशचे मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी, अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष अनिष मणियार, युवा महेशचे अध्यक्ष आनंद मणियार, राजू पोफळे, नगरसेवक किशोर पवार यांनी सत्कार करुन अभिनंदन केले. याप्रसंगी युवा महेशचे सचिव भारतभूषण नावंदर, कोषाध्यक्ष सीए. योगेश झंवर, प्रा.सचिन बाहेती, संगमनेर तालुका सभेचे अध्यक्ष अतुल झंवर, कोषाध्यक्ष श्रीनिवास भंडारी, सह-सचिव जुगलकिशोर बाहेती, संघटन मंत्री संजय रा. मालपाणी, सुजित खटोड, जयप्रकाश भुतडा, महिला मंडळाच्या सरला आसावा, स्वप्नाली तापडे आदी उपस्थित होते.

Visits: 158 Today: 1 Total: 2059931

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *