शहात्तर आदिवासी गावांत ‘एक गाव एक गणपती’

नायक वृत्तसेवा, राजूर
तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या 76 गावांत ‘एक गाव एक गणपती’ बसविण्यात आले. पंधरा हजार लोकवस्तीच्या राजूर गावात दोन वर्षापूर्वी 25, गतवर्षी 19 सार्वजनिक गणपती होते. मात्र, यंदा केवळ चार गणेश मंडळांनी गणपती बसविल्याची माहिती राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी दिली.

राजूरसह चाळीस गाव डांग भाग असलेल्या परिसरात कोरोना पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी गणपती न बसविण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक गावात एक गणपती बसवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे ठरविले आहे. यावर्षी गणेश मंडळांनी गावात स्वच्छता व वृक्षारोपण करण्याचा संकलप केला. त्यासाठी नियोजन करण्यात आले. राजूर पोलीस ठाण्याने एक गाव एक गणपती बसविण्याचे आवाहन केल्यावर स्थानिक ग्रामस्थ व गणपती मंडळांनी प्रतिसाद देत ‘एक गाव एक गणपती’ बसवून सहकार्य केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी आभार मानले.

Visits: 215 Today: 1 Total: 2058960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *