संगमनेर तालुका पोहोचला 27 व्या शतकाच्या उंबरठ्यावर..! शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत आजही 26 बाधितांची भर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात सुरु झालेल्या कोविड बाधितांच्या वाढीत आज आणखी चाळीस रुग्णांची भर पडली. शासकीय व खाजगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील नऊ जणांसह तालुक्यातील एकूण 17 जणांचे अहवाल आज पॉझिटिव प्राप्त झाले. त्यामुळे संगमनेर तालुक्याच्या बाधित संख्येने 27 व्या शतकाचा उंबरठा गाठताना 2 हजार 664 रुग्णसंख्या गाठली आहे. आजच्या अहवालातूनही तालुक्यातील बाधितांच्या संख्येला ओहोटी लागल्याचे दिसून आले.
गेल्या कही दिवसांपासून शहरी भागात आढळणाऱ्या रुग्णसंख्येला चाप लागल्याचे दिसत आहे. मात्र त्याचवेळी दोन महिन्यांपूर्वीपर्यंत संपूर्णतः नियंत्रणात असलेल्या ग्रामीण भागात मात्र दररोज मोठी रुग्ण संख्या समोर येत असल्याने तालुक्याने शहरी भागापेक्षा रुग्ण संख्येत दुपटीहून अधिक आघाडी घेतली आहे. लग्नसोहळे, सामूहिक कार्यक्रम व पितृपक्ष यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे बोलले जाते. त्यातच महानगरातील औद्योगिक वसाहतीत चाकरीत असलेले तालुक्यातील अनेक जण परस्पर गावाकडच्या घरी परतल्याने ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढीला हातभार लागल्याचा अनुमान आहे.
आज खासगी प्रयोगशाळेकडून 10 तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून सोळा जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यात शहरातील नऊजणांसह ग्रामीण भागातील 17 जणांचा समावेश आहे. यात शहरातील गणेशनगर परिसरातील 56 वर्षीय महिला, घोडेकरमळा परिसरातील 50 वर्षीय इसम, माताडेमळा परिसरातील बावीस वर्षीय तरुणासह 20 वर्षीय महिला, स्वामी समर्थ नगर मधील 47 वर्षीय तरुण, 40 वर्षीय महिला व 16 आणि बारा वर्षीय बालकांसह कुरणरोड परिसरातील 43 वर्षीय तरुणाचा अहवाल संक्रमित असल्याचा आला आहे.
यासोबतच तालुक्यातील गुंजाळवाडीतून आजही रुग्ण समोर आले असून तेथे बाधित आढळलेल्यांमध्ये पाचही महिलांचा समावेश आहे. त्यात अनुक्रमे 75, 56, 40, 20 व 18 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 39 वर्षीय तरुण, मालदाड येथील 63 वर्षीय इसम, जोर्वे येथील 39 वर्षीय तरुण, वनकुटे येथील 43 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, देवकौठे येथील 52 वर्षीय इसम, हिवरगाव पावसा येथील 26 वर्षीय तरुण, सायखिंडी येथील 43 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 70 वर्षीय महिलेसह 45 वर्षीय तरुण, जांबुत खुर्द येथील 38 वर्षीय तरुण तर अंभोरे येथील 33 वर्षीय महिला आदींचे अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही 26 रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या 2 हजार 664 वर पोहोचली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ५७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ८५.६७ टक्के इतके झाले आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्येत आज ७३९ ने वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ६८५ झाली आहे.
आज जिल्हा रुग्णालयाच्या कोविड प्रयोगशाळेत ८८, खाजगी प्रयोगशाळेत ३९५ आणि रॅपिड अँटीजेन चाचणीतून २५६ रुग्ण बाधीत असल्याचे आढळले.
आज बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये अहमदनगर ३९, पाथर्डी ०१, नेवासा ०३, श्रीगोंदा ०२, पारनेर ०३, अकोले ०२, राहुरी ०६, शेवगाव २६, जामखेड ०१ आणि लष्करी रुग्णालय ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत आज ३९५ रुग्णांची नोंद. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्र १५१, संगमनेर १०, राहाता ४०, पाथर्डी १३, नगर ग्रामीण ४८, श्रीरामपुर २२, लष्करी परिसर ०१, नेवासा २५, श्रीगोंदा ०८, पारनेर २०, अकोले ०१, राहुरी ३३, शेवगाव ०७, कोपरगाव ०८, जामखेड ०५ आणि कर्जत ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
रॅपिड अँटीजेन चाचणीत आज २५६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्र ४४, संगमनेर १६, राहाता ०९, नगर ग्रामीण ११, श्रीरामपूर २८, नेवासा २९, श्रीगोंदा १०, पारनेर ०९, राहुरी १०, कोपरगाव २४, जामखेड ३१ आणि कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज जिल्ह्यातील ३८० रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ६०, संगमनेर ०८, राहाता ३८, पाथर्डी १६, नगर ग्रामीण २२, श्रीरामपूर ०४, लष्करी क्षेत्रातील ०२, श्रीगोंदा ४१, पारनेर ३२, अकोले १२, राहुरी ३१, शेवगाव ३९, कोपरगाव २४, जामखेड २२, कर्जत २८ आणि इतर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
- जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या : ३१ हजार ५७१..
- जिल्ह्यात उपचार सुरु असलेले एकूण रुग्ण : ४ हजार ६८५..
- जिल्ह्यात आजवर कोविडने झालेले मृत्यू : ५९८..
- जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या : ३६ हजार ८५४..
- जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सरासरी ८५.६७ टक्के..
- जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना डिस्चार्ज तर ७३९ बाधितांची भर..