तालुक्याच्या रुग्ण संख्येने गाठले दुसरे सहस्रक! शहरातील आठ जणांसह 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नायक वृत्तसेवा संगमनेर

संगमनेर तालुक्यात सुरू झालेले कोरोनाचे संक्रमण अद्यापही मोठ्या प्रमाणात कायम असून आजही तालुक्याच्या रुग्ण संख्या 40 रुग्णांची भर पडली आहे. या संख्येने संगमनेर तालुक्यातील बाधितांनी दुसरे सहस्रक पूर्ण केले असून सद्यस्थिती तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दोन हजार एक झाली आहे. आजच्या बाधितांमध्ये संगमनेर शहरातील आठ जणांचा समावेश आहे. या अहवालातून तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात कोविडचा उद्रेक झाल्याचेही समोर आले आहे.

आज बाधित झालेल्या एकूण रुग्णांमध्ये संगमनेर शहरातील अवघ्या आठ रुग्णांचा समावेश असून त्यात पाटील मळा रस्त्यावरील 29 वर्षीय तरुण, नवीन नगर रस्त्यावरील 52 वर्षीय इसम, माळीवाडा परिसरातील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालपाणी लॉन्स परिसरातील 73 वर्षीय महिला, शिवाजीनगर परिसरातील सहा वर्षीय बालक, सावतामाळी नगर मधील 45 वर्षीय तरुण, गणेश नगर मधील 56 वर्षीय महिला व इंदिरानगर भागातील 34 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

शहरा सोबतच तालुक्याच्या रुग्ण संख्येत आज तब्बल 32 रुग्णांची भर पडली. आज शासकीय प्रयोगशाळेकडून केवळ एक अहवाल प्राप्त होऊन त्यात जाखोरी येथील 55 वर्षीय महिलेस कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील 22 वर्षीय तरुण, अकलापुर येथील 51 वर्षीय इसम, निमगाव जाळी येथील एकूण 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिक,

चिखली येथील 76 वर्षीय महिलेसह 32 वर्षीय तरुण, कासारे येथील 57 वर्षीय इसम, नांदुरी दुमाला येथील 29 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील साठ वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कोल्हेवाडीतील 37 वर्षीय तरुण, समनापुर मधील 31 वर्षीय तरुण, रायते येथील 50 वर्षीय महिला 17 वर्षीय तरुण, कौठे धांदरफळ येथील साठ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 34 वर्षीय तरुण व तीस वर्षीय महिला तसेच,

तालुक्यातील गुंजाळवाडीत आज कोविड विषाणूंचा उद्रेक झाला. तेथील पंधरा जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. त्यात 56, 50, 37, 36, 36, 35, 17, 13, 14, 11, 4, 13,  वर्षीय महिलांसह 41 वर्षीय तरुण व 13 वर्षीय व चार वर्षीय बालकाचा समावेश आहे. त्यासोबतच खराडी येथील 48 वर्षीय इसमाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजच्या रुग्णसंख्येत नव्याने 39 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याच्या रुग्ण संख्येने दुसरे सहस्रक ओलांडतांना 2 हजार 1 पूर्ण संख्या गाठली आहे.

Visits: 312 Today: 1 Total: 1804871

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *