कोपरगावातील प्रभाग पाचमध्ये औषध फवारणी
कोपरगावातील प्रभाग पाचमध्ये औषध फवारणी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील कोरोना साखळी तोडण्याचे काम प्रशासन, नगरपालिका व पोलीस अहोरात्र करत आहेत. त्याचबरोबर काही सामाजिक संस्थाही प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील मुंबादेवी तरुण मंडळ व साई गाव पालखी यांच्या सहकार्याने पाचमध्ये स्वखर्चाने नुकतीच औषध फवारणी करण्यात आली.

यावेळी युवा कार्यकर्त्यांनी आपले घर व आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी देखील जनजागृती केली. तसेच प्रत्येक भागात असाच उपक्रम सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी राबविला तर नगरपालिका व प्रशासनाला सहकार्य होईल. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपलेही कर्तव्य आहे. आपले गाव सुरक्षित असले तर आपला परिवारही सुरक्षित राहील असे मत अध्यक्ष सुनील फंड यांनी यावेळी व्यक्त केले. याकामी पत्रकार अक्षय काळे, कृष्णा दळवी, गोपाल वैरागळ, राहुल पांडे, समाधान कंदे, विशाल वाघ, किरण सूर्यवंशी, अमोल देवकर, विवेक फंड, उजेब आत्तार, देवेद छाजेड, जबेत आत्तार, करण दळवी, मयूर दळवी, गोविंद विसपुते आदिंनी परिश्रम घेतले.

