‘मिनी लॉकडाऊन’मधून सलून व्यवसाय वगळा ः कदम
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘बे्रक दि चेन’ धोरणांतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना आणि दुकाने बंद ठेवण्याचे आदेश बजावले आहेत. यामुळे सलून व्यवसाय बंद राहिल्यास उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होईल. त्यासाठी सलून व्यवसाय मिनी लॉकडाऊनमधून वगळावा, अशी मागणी नाभिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संकटामुळे सलून व्यवसायावर कुर्हाड कोसळली आहे. मागील लॉकडाऊनमधून कसेबसे सावरुन व्यावसायिक सावरले होते. त्यात पुन्हा राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘बे्रक दि चेन’ धोरणांतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे सरकारने आमच्यावरील अन्यायकारक निर्णय रद्द करुन मिनी लॉकडाऊनमधून सलून व्यवसायास वगळावे अशी मागणी नाभिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कदम यांनी केली आहे.