अवैध दारू विक्री करणार्‍या तिघांवर गुन्हा


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैधरित्या दारूची विक्री करणार्‍या तिघांवर कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई सोमवारी (ता.5) रात्री 9 वाजेच्या सुमारास व मंगळवारी (ता.6) दुपारी 5 वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे.

सोमवारी मध्यरात्री पोलीस नाईक रामकृष्ण खारतोडे यांनी शहरातील खंदकनाला परिसरात विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून दारूचा बॉक्स घेऊन जाणार्‍या सागर शंकर गिरमे व रवींद्र निंबा साळुंके (दोघे रा.येसगाव, ता.कोपरगाव) यांच्यावर कारवाई करीत गुन्हा दाखल करून त्यांच्याकडील दारूचा बॉक्स व दुचाकी असा 18 हजार 280 रुपयांचा मुदेमाल हस्तगत केला आहे. तर मंगळवारी पोलीस हवालदार संभाजी शिंदे यांनी शहरातील हनुमानगर येथे विक्रम सुदाम चंदनशिव (वय 37, रा.105 हनुमाननगर, कोपरगाव) हा त्याच्या घरात दारूची विक्री करीत असताना त्याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्याकडून 1,300 रुपये किंमतीच्या 25 दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Visits: 151 Today: 1 Total: 1952244

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *