कार्यकर्त्यांनी टीका टिप्पणीकडे दुर्लक्ष करावे ः गायकर

नायक वृत्तसेवा, अकोले
जनता माझ्या कामाचे नक्कीच योग्य मूल्यमापन करेल. परंतु समाज माध्यमांवरुन होत असलेल्या टीका टिप्पणीकडे कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष करावे असे आवाहन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सीताराम गायकर यांनी अनुयायी व समर्थकांना केले आहे.

सीताराम गायकर यांच्यासह अगस्तिच्या अकरा संचालकांसह समर्थकांनी नुकताच मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर सध्या समाज माध्यमांवर माजी आमदार वैभव पिचड यांचे समर्थक व कार्यकर्त्यांकडून टीका होत आहे. बर्‍याच वेळा व्यक्तिगत पातळीवर टीका होत असल्याचेही दिसत आहे. याबाबत अनुयायी व समर्थकांना आवाहन करताना गायकर म्हणाले, जेव्हा वेळ येईल तेव्हा जनताच याला चोख उत्तर देईल. आणि माझ्या कामाचे योग्य मूल्यमापन करेल. तेव्हा तुम्ही या फंदात पडू नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे. सध्या त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे सर्वत्र फलक लागत असून स्वागत होत आहे.

Visits: 115 Today: 2 Total: 1098882

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *