देशमानेंच्या वाढदिवसानिमित्त मोफत मास्कचे वाटप
नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने यांच्या वाढदिवसानिमित्त समूहातील काही तरुणांनी एकत्रित येत नवीन नगर रस्त्यावरून प्रवास करणार्या नागरिकांना मोफत दहा हजार मास्कचे वाटप केले. या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोना विषाणूने पुन्हा थैमान घातल्याने बाधितांच्या संख्येत रोज नव्याने भर पडत आहे. संक्रमण रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर स्वदेश उद्योग समूहाने संस्थापक बाळासाहेब देशमाने यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या लढ्यात आपलेही योगदान असावे हा उदात्त हेतू ठेवून मोफत दहा हजार मास्कचे वाटप केले आहे. या उपक्रमात उद्योग समूहातील गंगाराम सातपुते, गणेश पानसरे, अक्षय पानसरे, महेश हांडे, भूषण काशिद आदी तरुणांनी राबविला. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.