नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणारच : चित्ते

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर 
नगर परिषदेचे नगराध्यक्षपद खुले झाल्याने भाजपाचे ओबीसी सेलचे माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची घोषणा पत्रकार परिषेदत केली. 
चित्ते म्हणाले, की गेली ३५ वर्षे आपण भारतीय जनता पार्टीचे जीव ओतून काम केले आहे. इतक्या वर्षांनंतर माझ्या विस्थापित कार्यकर्त्यांना मोठ्या पदाची संधी आली आहे. त्यामुळे भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर माझा हक्क व अधिकार आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना भेटून उमेदवारीचा आग्रह धरणार आहे. उमेदवारी मिळाली नाही, तरी नगराध्यक्ष पदाची निवडणूक यंदा लढवणारच असल्याची घोषणा  त्यांनी केली. ते म्हणाले की, कित्येक वर्षांनंतर श्रीरामपूरची नगराध्यक्ष पदाची जागा खुली झाली. ३५ वर्षे मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी श्रीरामपुरात भाजपा व हिंदुत्ववाद रूजवण्याचे काम केले.त्यामुळे भाजपाच्या उमेदवारीवर आमचा नैतिक अधिकार आहे. आमचा ब्लड ग्रुप हा भाजपाचा आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांना भेटून उमेदवारीसाठी आग्रही मागणी करणार आहोत. आम्हाला न्याय न मिळाल्यास त्यांची माफी मागून आम्ही निवडणूक मात्र लढवणारच असल्याचे चित्ते यांनी जाहीर केले. आम्ही आजपासून निवडणुकीच्या कामाला लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्रीरामपूरसारखी अतिक्रमण हटाव मोहीम इतरत्र कोठेही राबवली गेली नाही. आपल्याला जर नगराध्यक्ष पदाची संधी दिली तर पहिल्या १०० दिवसात अतिक्रमण हटावमध्ये ज्यांची दुकाने गेली त्यांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे चित्ते म्हणाले. यावेळी संजय पांडे, बबन मुठे, किरण लुणीया, शशिकांत कडुस्कर, राजेंद्र कांबळे, सुनील मुथ्था, आसने, मनोज हिवराळे आदी उपस्थित होते.
Visits: 132 Today: 1 Total: 1916959

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *