मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख २७ हजारांची मदत

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
राज्यातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा’ उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक आणि सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेत मदत केली आहे. या उपक्रमात श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील विठ्ठल मंदिर देवस्थान यांनी एक लाख रूपयांच्या धनादेशाच्या माध्यमातून मदत सुपूर्द केली आहे. तर पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील ग्रामस्थांनी २७ हजार रूपये ऑनलाईन वर्ग करून मदत केली.

विठ्ठल मंदिर देवस्थानाच्यावतीने अध्यक्ष ना.पु.पवार यांनी श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे एक लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द केला. तर पिंपळगाव रोठा ग्रामस्थांच्या वतीने सचिन अनंत यांनी २७ हजार रूपयांची रक्कम निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर तीच रक्कम ग्रामस्थांच्या बॅंक खात्यामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ऑनलाईन वर्ग करण्यात आली. ग्रामस्थांमध्ये संदीप मार्तंड जगताप (५,००१), अशोक महादू घुले (२,१११), सुभाष किसन आरेकर (२,००१), नंदू विष्णू अनंत (२,००१), चंद्रकांत राजाराम कुलकर्णी (१,५५५), अमोल भाऊ घुले (१,१११), संभाजी सिताराम घुले (१,१११), तुकाराम मार्तंड मेहेर (१,१११), सोमनाथ शिवाजी घुले (१,००१), स्वप्नील सुभाष जगताप (१,००१), स्वप्नील बाबाजी जाधव (१,००१), दिलीप ज्ञानदेव जगताप (१,००१), सुनील कोंडीभाऊ जगताप (१,००१), वनिता अनिल ढेरंगे (१,०००), सुनील लहू घुले (१,०००), भरत ज्ञानदेव घुले (१,०००), रामकृष्ण हरी (१,०००), अमोल लहू रणशूर (५००), शमशुद्दीन हवालदार (५००), युवराज आनंदा घुले (५००), रोहिणी संतोष ढोमे (५००) यांनी आपले योगदान दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे समाजसेवा अधीक्षक अजय काळे यांनी नागरिकांना आवाहन केले की, पूरग्रस्तांना सध्या निवारा, अन्नधान्य, कपडे, स्वच्छतेची साधने व औषधांची तातडीची आवश्यकता आहे. तसेच तंबू, चादरी, तांदूळ, डाळी, तेल, दूध पावडर, पिण्याचे पाणी, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स, मास्क, औषधे, ओआरएस, पशुखाद्य, टॉर्च, ताडपत्री, सोलर लॅम्प या वस्तूंची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आपण दिलेला प्रत्येक रुपया, प्रत्येक वस्तू पूरग्रस्त कुटुंबांसाठी जीवनदायी ठरेल. संकटाच्या काळात हात देणं हीच खरी सेवा आहे असे त्यांनी नमूद केले.

Visits: 52 Today: 2 Total: 1099509
