लोकशाहीचे भविष्य पत्रकारीतेच्या हाती : देशमुख 

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पत्रकारिता जर सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून केली तर देशातील कोणतेही सरकार झुकल्याशिवाय राहत नाही.या देशातील लोकशाहीचे भविष्य पत्रकारीतेत दडलेले असल्याचे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी केले. 
सी न्युजचे संपादक बाळासाहेब गडाख यांची व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्याचा शहरातील मराठा पतसंस्थेच्या शाखेच्या  वतीने माजी उपनगराध्यक्ष  राजेंद्र देशमुख यांचे हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. देशमुख पुढे म्हणाले की,आज ग्रामीण भागातील तरुण सर्वच क्षेत्रात आपले काम दाखवुन देत आहेत. ही फार मोठी अभिमानास्पद बाब आहे.
कर्तव्य विवाह बंधनचे संचालक  संदिप शेळके म्हणाले की, चांगले काम करणाऱ्या माणसाला योग्य माणसाच्या हातुन सन्मान मिळाला तर तो अधिक चांगले काम करतो व त्याची जबाबदारी वाढते.मराठा पतसंस्थेचे संचालक  काशिनाथ डोंगरे म्हणाले की, पत्रकारिता काय करु शकते याचे ताजे उदाहरण नेपाळमधील जनतेचा उठाव आहे.ग्रामिण भागातील विलास बडे यांनी शेतकरी विषय व्यवस्थीतपणे हाताळला तर सरकारला झुकावे लागले.ही पत्रकारीतेची  ताकद आहे.म्हणुन लोकशाहीत पत्रकार हा व्यवस्थेचा कणा आहे. बाळासाहेब गडाख म्हणाले की,एखादा चैनल चालविणे म्हणजे दिव्य परीक्षा आहे.कारण जनता व राज्यकर्ते यांना जोडणारा दुवा आहे. पत्रकार  प्रचंड सामाजिक क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी काम करतो.हे करत असताना पत्रकार हाही माणुस आहे, ‌त्याच्या प्रापंचीक गरजा  भागविण्यासाठी सतत संघर्ष करुन काम मिळवावे लागते.पण अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर तुम्हाला फार कमी यश हातात येते, पण थांबून चालत नाही तर काम करावे लागते.माझी निवड ही कामातुन झाली असल्याचे सांगत त्यांनी सत्काराबद्दल  आभार व्यक्त केले.
शांताराम घुले म्हणाले मला आपल्या निवडीचा सार्थ  अभिमान आहे.मराठा पतसंस्था नेहमी प्रयत्न करणारे व यशस्वी होणारे यांचा सत्कार करते यावेळी बी.जे. आमटे,नवले, देशमुख, शाखाधिकारी अरगडे व कर्मचारी  उपस्थित होते.
Visits: 530 Today: 5 Total: 1950406

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *