लायन्स क्लबच्या वतीने पोखरी हवेलीत वृक्षांचे रोपण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरच्या वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन या उपक्रमांतर्गत तालुक्यातील पोखरी हवेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दहा फूट उंची असलेल्या ३० वृक्षांचे रोपण करण्यात आले.

याप्रसंगी लायन्स सफायरचे अध्यक्ष कल्याण कासट, सेक्रेटरी सुमित मणियार, प्रकल्प प्रमुख देविदास गोरे, सरपंच सुदाम खैरे, उपसरपंच सोमनाथ थिटमे, नारायण कोल्हे, प्रियंका कासट, पुष्पा गोरे, नम्रता अभंग,समाधान गोर्डे, नंदू घुले आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रकल्प प्रमुख देविदास गोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रत्येक वर्षी लायन्स शाळेला करत असलेल्या मदतीचा आढावा घेत त्यांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले.अध्यक्ष कासट यांनी शाळेतील विविध उपक्रमांच्या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करत वृक्षारोपण केलेल्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपवली.

उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते ३० वृक्षांचे रोपण करण्यात आले. या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन आगळे, उपाध्यक्ष संदीप खैरे व सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एकनाथ साबळे, शिवाजी नरवडे, सुरेश साळुंके,दस्तगीर शेख, शकुंतला शेळके, सखाराम पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, सोनाली बागुल आदींनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सोमनाथ मदने यांनी केले.

Visits: 70 Today: 2 Total: 1108445
