वसुंधरा अकॅडमीला कबड्डी स्पर्धेत बेस्ट परफॉर्मन्स ट्रॉफी 

नायक वृत्तसेवा, अकोले 
जळगाव येथील  काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल येथे सीबीएससी बोर्ड आयोजित येथील वसुंधरा अकॅडमीला विभागीय पातळीवर कबड्डी स्पर्धेत बेस्ट परफॉर्मन्स ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
या कबड्डी स्पर्धांमध्ये वसुंधरा अकॅडेमीच्या  अंडर १४ मुलींचा संघ व अंडर १७ मुलांचा संघ अशा दोन टीमचा सहभाग होता. त्यामध्ये मुलांच्या अंडर १७ च्या  टीममध्ये आयुष लहामगे,सार्थक तळपे,आर्यन मुठे,विराज धुमाळ, पार्थ कांबळे,अक्षत कोंडार, साई दिघे या मुलांचा सहभाग होता. वसुंधरा अकॅडमीच्या मुलांच्या टीमला बेस्ट परफॉर्मर म्हणून निवडण्यात आले. मुलींच्या अंडर १४ च्या  टीम मध्ये अनुष्का पांगरकर, नालंदा जाधव, स्वराली वाकचौरे,स्वराली राऊत,रिद्धी वैद्य,सिद्धी वैद्य,अक्षरा घुले  या विद्यार्थिनींचा सहभाग होता. या स्पर्धेला महाराष्ट्र व गोवा येथून १२८ टीम आल्या होत्या.
त्यामध्ये वसुंधरा अकॅडमीच्या  मुलींच्या टीमने देखील बेस्ट परफॉर्मर  ट्रॉफी पटकावली. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक गोरक्षनाथ पोपेरे, सचिन बोंबले तसेच वर्षा गोडे  यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले, कोषाध्यक्ष तथा कॅम्पस डायरेक्टर व वसुंधरा अकॅडमीच्या प्राचार्या डॉ.जयश्री देशमुख,उपप्राचार्या राधिका नवले, सचिव विक्रम नवले,मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्या  अल्फोसा डी.व सर्व विभागाचे प्राचार्य व शिक्षक यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Visits: 263 Today: 2 Total: 2062865

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *