शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांचे खुलले चेहरे  आ.खताळ यांच्या माध्यमातून शालेय साहित्याचे वाटप

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
तालुक्यातील चंदनापुरी, आनंदवाडी,जावळेवस्ती व ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २८७ विद्यार्थ्यांना आ.अमोल खताळ यांच्या  माध्यमातून  शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे शालेय साहित्य मिळाल्याने बाल विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले. 
 आमदार अमोल खताळ यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला हार, गुच्छ व इतर अनावश्यक खर्चाला फाटा देत शालेय साहित्य आणण्याचे आवाहन   केले होते. त्यानुसार कार्यकर्त्यांनी वह्या व इतर शालोपयोगी साहित्य भेट म्हणून आणले होते. सर्व शालेय साहित्य आमदार अमोल खताळ यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावातील गोरगरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील  विद्यार्थ्यांना वाटप केले.त्याचाच एक भाग म्हणून  चंदनापुरी,आनंदवाडी,जावळेवस्ती व ठाकरवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्वच  विद्यार्थ्यांना  शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे,भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य दादा गुंजाळ,  सुशील शेवाळे, विलास सरोदे, अमोल राहणे,डॉ.अभय बंगाळकर,माजी सरपंच रोहिदास राहणे, अंकुश राहणे, रवींद्र राहणे, ज्ञानदेव राहणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी सुरेश राहणे, सीताराम राहणे, बाळासाहेब सरोदे,विलास सरोदे, शरद सरोदे,रावसाहेब सातपुते,विलास राहणे,विकास राहणे,सुनील राहणे,रामचंद्र सरोदे, बाळकृष्ण सरोदे,  अमोल रहाणे, सुरेश राहणे, मधुकर राहणे, दादाभाऊ शिरतार, जय मल्हार ग्रुप चंदनापुरी यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Visits: 197 Today: 1 Total: 2060888

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *