मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई करणार का? : आ.खताळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील अवैध कत्तलखाना प्रकरणातील आरोपीवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची चुकीची माहिती मुख्यमंत्र्यांना देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? तसेच अवैध कत्तलखाने सुरू असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई होणार का? असा सवाल आमदार अमोल खताळ यांनी सभागृहात उपस्थित करत पुन्हा एकदा मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांचे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, तसेच कडक कारवाईसाठी कायद्यात काही तरतुदी करून बदल केले जातील असे सभागृहात सांगितले.

संगमनेर शहरातील अवैधरित्या सुरू असणाऱ्या कत्तलखान्याबाबत संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या कडून मुख्यमंत्र्याना खोटी माहिती देण्यात आली होती.या पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली सर्व माहिती खोटी अन् दिशाभूल करणारी असल्याचे आ.अमोल खताळ यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत ज्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती सादर केली, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? तसेच अवैध कत्तलखाने सुरू असलेल्या पोलीस हद्दीतील अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई होणार का? असे एकामागे एक प्रश्न उपस्थित करत या महत्वाच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा आमदार अमोल खताळ यांनी गृहराज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, तसेच कडक कारवाईसाठी कायद्यात काही तरतुदी करून बदल केले जातील असे सभागृहांत सांगितले. त्याच बरोबर ज्या ठिकाणी अवैध कत्तलखाने सुरू आहेत, त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले जातील असे हि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.

Visits: 128 Today: 1 Total: 1596945
