मोकाट जनावरांची तस्करी करणार्यांना कठोर शासन करा!
मोकाट जनावरांची तस्करी करणार्यांना कठोर शासन करा!
कोपरगाव शिवसेनेची नगरपालिका व पोलिसांकडे मागणी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील मोकाट फिरणारे जनावरे गायी, म्हशी, शेळ्या यांची तस्करी थांबवून संबंधित गुन्हेगारांना पकडून कठोर शासन करावे, अशा मागणीचे निवेदन बुधवारी (ता.30) शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सनी वाघ यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव नगरपालिका व पोलीस ठाण्याला देण्यात आले.

कित्येक महिन्यांपासून कोपरगाव शहरात मोकाट फिरणारे जनावरे गायी, म्हशी, शेळ्या यांची तस्करी होत आहे. तरी वारंवार पोलीस ठाणे व नगरपालिकेला कल्पना देऊनही त्यावर काहीही निर्बंध लादले नाही. 28 सप्टेंबर, 2020 रोजी रात्रीच्या वेळेस कुलस्वामिनी हाईट्स समोर गायीच्या मानेवर भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले व त्या गायीची चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिकांनी बघितल्यावर चोरटे पळून गेले. चोरीसाठी काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा वापर चोरटे करत आहेत. तरी या घटनेचा तातडीने तपास होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे रवींद्र कथले, उपशहर प्रमुख बालाजी गोर्डे, अमोल शेलार, संघटक वसीम चोपदार, सुनील तिवारी, सागर फडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश जाधव, शहरप्रमुख नितीश बोरुडे, तालुकाप्रमुख सिद्धार्थ शेळके, उपशहर प्रमुख ऋषी धुमाळ, मयूर फुकटे, शिवम नागरे, उपतालुकाप्रमुख विजय भोकरे, शाखाप्रमुख डी. के. पाटील आदिंनी केली आहे.

