महालगाव शिवारातून अहोरात्र बेसुमार वाळू उपसा महसूलचे दुर्लक्ष; ग्रामस्थांकडून व्यक्त होतोय संताप

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील महालगाव, मालुंजे शिवारातून प्रवरा नदीपात्रातून परवान्याच्या नावाखाली जेसीबीच्या साह्याने नियम धाब्यावर बसवून अहोरात्र बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. यामुळे या भागातील रस्त्यांची पूर्ण वाट लागली आहे. तसेच भूगर्भातील पाणी पातळीवर याचा गंभीर परिणाम होणार असल्याची भीती परिसरातील शेतकर्‍यांत निर्माण झाली आहे. याकडे महसूल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.

महालगाव, मालुंजे येथील प्रवरा नदीपात्रातून 20 दिवसांत 3 हजार 500 ब्रास वाळू उपसा करण्याचा परवाना आहे. मात्र, गेल्या 5 दिवसांत 5 ते 6 ब्रास वाहतूक क्षमतेचे जवळपास 100 ते 125 वाहनांनी दररोज जेसीबीच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. वाळू उपसा हा तीन फुटांपर्यत असताना नदीपात्रात मात्र 15 ते 20 फुटांपर्यत खड्डे पडले आहे. तसेच वाळू उपशासाठी फक्त दिवसाच परवानगी असताना रात्रंदिवस वाळू उपसा सुरू आहे.

चार वर्षांपूर्वी अशाच बेसुमार वाळू उपशामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने या परिसरातील शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. तीच परिस्थिती परत निर्माण होती की काय? अशी भीती व्यक्त करत पर्यावरणावर याचा गंभीर परिणाम होणार आहे. तर वाळू वाहतूक करणारे साधनांची वाहतूक क्षमता जास्त असल्याने या भागातील रस्त्यांची 5 दिवसांत बिकट अवस्था झाली आहे. महसूल प्रशासनाने संबधितांना 3 हजार 500 ब्रास वाळूचा परवाना दिला आहे. त्यापेक्षाही जास्त प्रमाणात वाळू 5 दिवसांतच उपसली असून नदीपात्रातील खड्ड्यांचे इनकॅमेरा मोजमाप करून या परवानाधारकावर कारवाई करून सदरील वाळू उपसा त्वरीत बंद करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 116772

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *