जैन काच मंदिरास ग्वाल्हेरच्या पोलीस प्रमुखांची भेट
नायक वृत्तसेवा, राहाता
शिर्डी शहरात जैन समाजाने उभारलेल्या भव्य शांतीनाथ जैन काच मंदिरास ग्वाल्हेर येथील जिल्हा पोलीस प्रमुख विनीत जैन दाम्पत्यांनी नुकतीच भेट देऊन दर्शन घेतले असता त्यांचा शिर्डी शहरातील जैन समाजाच्यावतीने उद्योजक किशोर गंगवाल व मीनाक्षी गंगवाल, जैन समाज अध्यक्ष सतीश गंगवाल, ज्येष्ठ नागरिक मोतीलाल गंगवाल, अशोक काळे आदिंनी सत्कार केला.
यावेळी बोलताना पोलीस प्रमुख जैन म्हणाले, शिर्डीसारख्या साईबाबांच्या भूमीत 13 गुंठे जागेत उभारण्यात आलेले जैन काच मंदिर, जैन संत व माताजी यांच्या सेवेसाठी उभारलेल्या त्यागी भवनाचे काम बघितल्यावर मनाला समाधान व भावी पिढीला प्रेरणा देणारे आहे. विशेष म्हणजे मनःशांतीसाठी समाधान देणारी ही बाब असल्याचेही ते आवर्जुन सांगत जैन समाजातील विचारांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी हे पुरक असून सर्व जैन बांधवांनी एक विचाराने केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. यावेळी सतीश गंगवाल यांनी काच मंदिर व सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शेवटी प्रतीक गंगवाल यांनी आभार मानले.