इंदोरीकर महाराजांचे 30 मे पर्यंत सर्व कार्यक्रम रद्द! आयोजकांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी मागत काढलं पत्रक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीचा विश्राम करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे त्यांचे 23 मे ते 30 मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरीकर महाराजांना किडनी स्टोनचा त्रास होत असून, संगमनेरमध्ये त्यांच्यावर हायड्रो थेरेपी केली जाणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, गरज पडली तर शस्त्रक्रिया केली जाईल अशी माहिती आहे. खरंतर, भजन-कीर्तनं आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. अशात कीर्तन म्हटलं की आठवतात ते समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर. इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी सगळेच उत्साही असतात. पण आता पुढचे काही दिवस त्यांचे कीर्तन ऐकता येणार नाही. कारण, त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.

महाराजांचे अनेक ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम होते. पण सर्व कार्यक्रम रद्द झाल्यामुळे आयोजकांची गैरसोय झाली आहे. यासंबंधी इंदोरीकर महाराजांची दिलगिरी व्यक्त केली असून पत्रक जारी केले आहे. तर वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा सेवेत रूजू होणार असल्याचंही त्यांनी पत्रामध्ये लिहलं आहे.

Visits: 242 Today: 1 Total: 2125635

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *