बेकायदेशीर मुरूम वाहतूक बंद करण्याची मागणी
बेकायदेशीर मुरूम वाहतूक बंद करण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कर्मवीर नगर व दुल्हनबाई वस्तीमधील नागरिकांनी या परिसरातील बेकायदेशीर मुरूम वाहतूक बंद करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी निसार हाजी शेख यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
कर्मवीर नगर, दुल्हनबाई वस्ती परिसरातील एका नामांकित वकीलाचा मुरूमाचा धंदा अनेक वर्षांपासून चालू आहे. त्यांच्याकडे डंपर, जेसीबी, पोकलेन मशीन असून सतत त्यांची येथील रस्त्यांवरुन ये-जा असते. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या घरांत धुळीचे साम्राज्य पसरते. तर अनेकांच्या घरांच्या भितींनाही तडे गेले आहेत. रस्त्याची तर अक्षरशः वाट लागली आहे. सदर जागा ही मदरसा ट्रस्टची असल्याने ते साफसफाई देखील करू देत नाही. तरी आपण याची गांभीर्याने दखल घेऊन बेकायदेशीर मुरूम वाहतूक तात्काळ बंद करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.