डॉ.गाडेकरांकडून वीरभद्र महाराजांना 21 भार चांदी अर्पण
डॉ.गाडेकरांकडून वीरभद्र महाराजांना 21 भार चांदी अर्पण
नायक वृत्तसेवा, राहाता
राहाता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराजांच्या मंदिरातून चोरीस गेलेले मुकूट व इतर चांदीच्या वस्तू पुन्हा नव्याने बनविणेकामी येथील धन्वंतरी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी याकरीता 21 भार चांदी वीरभद्र महाराजांच्या चरणी नुकतीच अर्पण केली आहे.
वीरभद्र महाराज मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी देवाचे चांदीचे तीन मुकूट व इतर वस्तू चोरून नेल्या आहेत. याबाबतची माहिती समजल्यानंतर राहाता तालुक्यातील सेवाभावी डॉक्टर, दानशूर व्यक्तीमत्व, धन्वंतरी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांनी चोरीस गेलेल्या चांदीच्या वस्तू पुन्हा नवीन बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याकामी स्वतःच देवस्थानचे अध्यक्ष सागर सदाफळ यांच्याकडे 21 भार चांदी घेण्याकरिता धनादेश सुपूर्द केला आहे. या शुभकार्याची सुरूवात स्वतःपासून करुन इतरांसमोर आदर्श ठेवत चोरीस गेलेले चांदीचे दागिने नव्याने घडविण्यासाठी स्वेच्छेने भक्त व ग्रामस्थांनी पुढे येवून या कार्यात खारीचा वाटा उचलावा असे आवाहनही डॉ.गाडेकर यांनी केले आहे. याप्रसंगी नपावाडीचे सरपंच दत्तू जाधव, शिवाजी सदाफळ, प्रवीण सदाफळ, गंगाराम बनकर, बाळासाहेब नवाळे, दिलीप वाघ, सोमनाथ भगत, अरुण मेहेत्रे, राधाकिसन भुजबळ, मनीष चितळकर, गणेश म्हसे आदी उपस्थित होते.