कार-दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात सोमवारी (ता.20) रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास कार व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सध्या पुणे येथे उपचार सुरू असल्याचे समजते.


तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने निमोण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश चांदोरकर नगरहून निमोणच्या दिशेने वॅगनोर कारमधून (क्र.एमएच.15, एफएन.7540) प्रवास करत होते. दरम्यान समोरून आलेल्या दुचाकीची (क्र.एमएच.15, जीएच.8643) तळेगाव दिघे शिवारात हॉटेल सौरभजवळ जोराची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार सुनील जगन्नाथ भडांगे (रा. कौठेकमळेश्वर) यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जबर जखमी झाले. त्यांना तातडीने प्रथम संगमनेर व त्यानंतर पुणे येथे रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रसंगी डॉ.संतोष डांगे, राहुल बायकर, मनोज दिघे, राजू भडांगे, सचिन जोंधळे यांनी मदतकार्य केले. अपघाताच्या घटनेबाबत स्थानिक युवकांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास माहिती दिली.

Visits: 154 Today: 1 Total: 1848493

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *