ग्रामीणभागात आजही पडली मोठ्या संख्येने रुग्णांची भर! शहरातील एका मृत्युसह नव्याने आढळले बारा संक्रमित रुग्ण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव दिवसोंदिवस पसरत असून ग्रामीणभागातील गावांमध्ये संसर्ग वाढत असल्याचे आजही समोर आले आहे. तालुक्याच्या 80 टक्के भागात विखुरलेल्या कोविडने आजही रुग्णसंख्येत भर घालतांना ग्रामीणभागाला लक्ष्य केले आहे. शासकीय व खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा करण्यात आलेल्या स्त्राव तपासणीतून आज 55 रुग्ण समोर आले असून त्यात शहरातील अवघ्या 12 जणांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्यातील बाधितांची संख्या आता 2 हजार 765 वर जावून पोहोचली आहे. त्यासोबतच आज सकाळी शहरातील एका प्रतीथयश व्यापार्याचा मृत्युही झाल्याने संगमनेर तालुक्यात कोविडची दहशत निर्माण झाली आहे.
गेल्या 26 ऑगस्टपासून तालुक्यातील व विशेष करुन ग्रामीणभागातील संक्रमणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यासोबतच या महिन्याची सुरुवातच माळीवाड्यातील 70 वर्षीय इसमाच्या मृत्युने झाली होती, त्यानंतर टप्प्याटप्प्याने पंधरा जणांचे बळी गेल्याने कोविडने आपली दाहकता पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. त्यातच गेल्या 10 सप्टेंबररोजी खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून संक्रमित असल्याचे समोर आल्यानंतर तेव्हापासून खासगी रुग्णालयात उपचार घेणार्या शहरातील बाजारपेठेतील गांधी चौकात राहणार्या 70 वर्षीय प्रतीथयश व्यापार्याचा आज सकाळी उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. कोविड नियमानुसार सदरचा मृत्यु कोविड संक्रमित म्हणून गणला जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र या मृत्युने गेल्या काही दिवसांत शहरीभागातील रुग्णसंख्या कमी होत असल्याच्या समाधानावर पाणी फेरले आहे.
आज शासकीय व खासगी प्रयोगशाळांसह रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा केल्या गेलेल्या स्त्राव तपासणीतून संगमनेर शहरातील पावबकीरोड येथून चार रुग्ण समोर आले असून त्यात 50 वर्षीय इसमासह 30 वर्षीय महिला तसेच अकरा व पाच वर्षीय बालिका, भारतनगर परिसरातील 51 व 28 वर्षीय महिलेसह 32 वर्षीय तरुण, मालदाड रोड येथील अकरा वर्षीय बालक, शिवाजीनगर मधील 71 वर्षीय जेष्ठ नागरिक, महात्मा फुलेनगर मधून 33 वर्षीय महिला, गणेशनगर मधील 49 वर्षीय इसम व 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल पॉझिटिव आला आहे.
त्यासोबतच आज ग्रामीणभागातील विविध ठिकाणाहून 43 रुग्ण समोर आले असून त्यात झोळे येथील 31 वर्षीय महिला, बोरबन मधील 34 व 33 वर्षीय तरुण, धांदरफळ बुद्रुक मधील 16 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 70, 52 व 48 वर्षीय इसमासह 38 वर्षीय तरुण, रायतेवाडी येथील 70 वर्षीय महिला, निमज मधील 32 वर्षीय तरुण, पेमगिरी येथील 22 वर्षीय तरुणी, संगमनेर खुर्द मधील 52 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 78 वर्षीय वयोवृद्ध, वडगाव पान मधील 58 वर्षीय इसमासह 27 व 24 वर्षीय तरुण, माळेगाव हवेली येथील 22 वर्षीय तरुणी,
गुंजाळवाडीतील 67 व 47 वर्षीय इसमासह 31 व 25 वर्षीय तरुण, 51 वर्षीय महिलेसह 30, 30 व 22 वर्षीय तरुणी, तसेच तीन वर्षीय बालक, आश्वी खुर्द मधील 38 वर्षीय तरुण, शेडगाव मधील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 58 वर्षीय महिला, जवळे कडलग मधील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सायखिंडी येथील 73 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर मधील 55 वर्षीय इसम, सुकेवाडी येथील 51 वर्षीय इसम, कोल्हेवाडीतील 48 वर्षीय इसम, कासारा दुमाला येथील 29 वर्षीय तरुण,
घुलेवाडीतील 67, 48 व 48 वर्षीय इसम, देवकौठे येथील 39 वर्षीय महिला, निमगाव बुद्रुक येथील 34 वर्षीय तरुण व 52 वर्षीय इसम, मंगळापुर मधील 58 वर्षीय इसम, खांडगाव येथील 28 वर्षीय महिला व ओझर खुर्द मधील 35 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला आहे. आजच्या रुग्णसंख्येत शहरातील 12 जणांसह ग्रामीणभागातील 43 जणांचा समावेश आहे. आज बाधितांच्या संख्येत 55 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची रुग्णसंख्या 2 हजार 765 वर पोहोचली आहे.
गेल्या महिन्यापर्यंत एखाद् दुसरा रुग्ण असलेल्या गावांमधील कोविडचे चित्र अवघ्या पंधरा-तीन वारात बदलल्याचेही निरीक्षण समोर आले आहे. त्यात एकट्या घुलेवाडीतून आत्तापर्यंत 202 रुग्ण समोर आले, त्यातील दोघांचा मृत्यु झाला तर सोळा जणांवर उपचार सुरु आहेत. त्या खालोखाल गुंजाळवाडीतूनही उशीराने तब्बल 121 रुग्ण समोर आले, त्यातील चौदा जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. सुरुवातीला अगदीच नामानिराळ्या असलेल्या चंदनापूरीतून अलिकडच्या कालावधीत तब्बल 65 रुग्णसमोर आले, त्यातील दोघांचा बळी गेला, वेल्हाळे येथेही मोठा प्रादुर्भाव होवून तेथून 24 रुग्ण समोर आले तर एकाचा बळी गेला. मनोलीतूनही 21 रुग्ण समोर आलेतर एकाला जीव गमवावा लागला. यासर्व भागात गेल्या महिना-पंधरा दिवसांत मोठ्या संख्येने रुग्ण समोर आले आहेत.